Wednesday, October 13, 2010

मी

माज्या जीवनातला जगन्या करीता धडपड हा प्रकार संपलेला आहे। मला काही मिलवायाचे नाही कोणी व्हायचे नाही॥ मी जसा आहे तसा अति सुखी आहे।,आनंदात आहे.तुमचे माझे जग आता वेगले झालेले आहे.तुमच्या दृष्टि कोनातुन ज्या गोष्टी महत्वाच्या आणि आवश्यक त्या मला तशा वाटत नाहीत.माझ्या पुरते हे निश्चित झाले झाले आहे की उच्च हेतु वगैरेना माझ्या मते जीवन साफ्ल्याच्या दृष्टीने कडिची ही किम्मत नाही.ऐहिक लागेबांधे इन्द्रियाना सुख देणारा गोष्टीची हाव माझ्या दृष्टीने कम अस्सल ठरली असून ,रुढ़ जगात वावरायला मी संपूर्ण अपात्र झालो आहे.

सामान्य मानुस

नियतीच्या गतिमध्ये कोणालाच बदल करता येत नसतो.आणि कोणीही कोणाला कायमचा आराम अगर रोग विकृति पासून कायमची मुक्ति देऊ शकत नाही.सर्व सामान्य माणसाला काहीही समजून घ्याचे नसते। त्याना मन लावून कोणताही प्रयत्न करायला नको असतो .आयुष्याला शिस्त्बध वलन लावून घेण्याची त्यांची तयारी नसते.शिक्न्याचे कष्ट नकोत,तपश्चर्या करायला नको। त्याना सोप्या गोष्टी देनगी रुपाने हव्यात। फ़क्त चमत्कार पहायला हवेत.गम्मत म्हणून।

०१.१०.2010