Sunday, June 7, 2015

काल रात्री पाऊस झाला नाही परंतु काल दिवस काही काळ पाऊस चांगला झाला लोकांनी पहिल्या पावसाचे आनंदाने स्वागत केले .  आता बघूया पुढे काय करतोय ते पाऊस आला पण अजून पावसाळा चालू झालेला नाही त्या मुळे अंगाची उलघाल मात्र चालूच आहे.

                                                   पाऊस पण आता मनाला पूर्वी सारखी उभारी देत नाही . मन नेहमी झाकोळलेले असेच  असते. आशध्य्सा प्रथम दिने असे काही वाटत नाही . मनाला पालवी काही फुटत नाही आज दहावी परीक्षेचा निकाल आहे.







०८। ०६ २०१५              रवींद्र शिंदे



                                     

Friday, June 5, 2015

ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता अशा थाटात आज सकाळी पावसाचे आगमन झाले . जुना मित्र  भेटला असा आनंद झाला  पहिल्या पावसाची अशी अनामिक ओढ जीवाला दर वर्षी लागत असते . पहाटे येणारा पाऊस मनाला खास सुखावून  जातो . दिवाळीच्या पहाटे जसे आनंदात असतो तसे ह्या वेळेस वाटते . घरातील सर्व साखर झोपेत असताना मी त्याचे स्वागत गरमा गरम चहाने करतो. माझ्या आयुष्यात दर वर्षी येणारा तो आनंद सोहळा असतो क़हि वर्षापूर्वी  खेरवाडा राजस्थान येथे असताना असाच पहाटे तो कोसळत आला  मला मनस्वी आनंद झाला झाला खूप जोरात तो कोसळत होता मी रवींद्र नाथांचे गीतांजली काढले आणि खिडकीत बसून मोठ मोठ्याने म्हणू लागलो पावसाचा आवाज इतका मोठा होता कि कुणाला काही ऐकू जात नव्हते अर्थात म्हणा सर्व गाढ झोपेत होते . अशा सुखद आठवणी मी साठवून ठेवल्या आहेत.





०५. ०६ २०१५