Friday, February 26, 2010

जीवनाच्या निरर्थकतेची जाणीव

बरच आयुष्य घालवल्यावर कधी तरी अस काहि घडतं घालवलेल्या आयुष्या बद्दल निराशा तर वाटतेच परन्तु भविष्या बद्दल मन कचरते.झालं ते पुरे झालं असचवाटायला लागत .नाही तरी पुढे आपन काय विशेष करणार असं मनाला वाटत रहाते आकाशात विहार करणारे आणि जलात संचार करणारे जश्या आपल्या । पावूल वाटा मागे ठेवत नाहीत तसं काहीसं नियति बद्दल घडत आसतं ती आपल्या येण्याची किंवा जाण्याची पुसट्सी कल्पना येवू देत नाही। आशा वेळेस ज्याला आपण कर्तुत्व समजत होतो ते शुन्य वत भासु लागतं। आपले म्हणून समजत होतो ते किती परके आहेत याची जाणीव होते। दोष त्यांचा नसतोच तो आपल्या जाणीवेचा असतो असं काहीसं मनात घोंगावत असतानाही आपण हे सर्व बांध तोडून मुक्त का होऊ नये?खर तर शरीराने मुक्त होण्याची शक्यता कमी असते पण मनाने तरी स्वताला का बंध मुक्त करू नये। पुन्हा पुन्हा नात्या गोत्याच्या बन्धनात का अडकून पडायच.मी म्हणून माझी जी ओळख आहे ती स्पष्ट पणे जगाला का सांगू नये?एकदाच लाभनारा हा माणूस जन्म कुणा साठी खर्च करायचा हे स्वातंत्र्य आपण का उपभोगयाचे नाही? दुःख:,निराशा ,राग,वेदना असं काहीसं जाणवत नाही पण अगतिकता मात्र जाणवते .काहि वर्षानी गात्रे शिथिल झाल्यावर ह्याची जाणीव फार तीव्रतेने होणार आहे। मग आजच आपण आपल्या मुक्त तेचा मार्ग का शोधू नये। संसार दुःख:आने भरलेला आहे उदया काहि तरी वेगले घडेल या भावनेने म्हणा किंवा भविष्याच्या भीतीने म्हणा आपण आहे त्याच चक्रात फिरत राहतो। कधी तरी यातून बाहेर पडायचा मानस करायलाच हवा तीच मुक्तीची सुरवात असेल। तरच आत्म्याची ओळख स्वताला होइल .खुपदा हे विचार स्मशान वैराग्य आल्या सारखे येतात अन जातात तस। होऊ नये .यातून बाहेर यायलाच हव । रविन्द्र २८.०२.२०१०

Wednesday, February 24, 2010

स्वताशी प्रामानिक

सुरवातीला वाटले होते की दररोज काही तरी लिहून होइल .पण आता ते जमत नाही काय लिहायचे हे समजत नाही।। जो पर्यंत अतुन काही उफलुन येत नाही तो पर्यंत शब्दंची कारागिरी निरर्थक असते। त्याने मनाला समाधान मिळत नाही।

Thursday, February 18, 2010

भिन्गुल लेल्या दिशा

ज्या वेळेस दिशा भिन्गुल लेल्या होतात तेंव्हा मनावर त्याच मलभ येतच असते .मावलतेच्या दिशेने चाललेल्या लोकाना ते लवकर जाणवत पण दिशा पाहून चालन पण आवश्यक असते। । जगण्याचा अर्थ समजला नाही तर जीवाना एतक निरर्थक दुसरे काही नसते। खाणे अणि पिणे ह्या साठी जन्म नक्कीच नाही। बहुतांशी आयुष्य गेल्यावर सुद्धा आलो इथे कशाला माझे मला कलेना अशी गत होते। पण तो पर्यंत पुला खालून बरच पाणी वाव्हून गेलेलं असते। मग उरते फ़क्त अगतिकता। हे सर्व वर्षा नु वर्षे , पिढ्या नि पिढ्या असच चालत आले। आपन फ़क्त नवे असतो मना सारख आयुष्य जगायला मिळाले असे सांगणारे जगाची आणि स्वताची फसवणूक करुन घेत असतात। मुलात जगात आपन आपल्या इछेने आलेलो नसतो। पूर्व जन्मिच्या कर्मानी आपल्याला इथे येण्यास भाग पाडलेले असते। अन ती सर्व भोगुन संपवावी लागणार आहेत अन त्याच बरोबर नविन कर्मंची गाठोडी घेवुन नविन जन्माच्या शोधात जाव लागणार आहे . रविन्द्र

Sunday, February 14, 2010

पुन्हा एकदा कोरेगांव पार्क

ओशो आश्रम आणि अरुणकुमार वैद्य यांचे निवास्थान यामुले प्रकाश जोतात आलेला कोरेगांव पार्क अरिया १३.०२.२०१० ला पुन्हा प्रकाश झोतात आला जर्मन बेकरिवर अतिरेक्यनी बोम्ब स्पोट घडवून आणला। ९ निष्पाप जिव मरण पावले ६० जन जख्मी जाले कोण मेले कोणा साठी?.देशा चा कारभार संभालनारे जर मूर्खा सारखे वागायला लागले तर काय होणार। पोलिसाना काय काम करायला द्यायचे हेच जर त्याना सक्जत नसेल तर असेच होणार। सिनेमाग्रहावर पोलिसाना काम करायला संगाने हाच मुळी त्यांचा अपमान आहे। अंतर्गत सुरक्षा सम्भालन्याची जबाबदारी ज्याना देता त्यानी कुणाच तरी पिक्चर चलावा यासाठी उन्हात उभे रहायला सांगता। याहि पुढे वेळ पदल्यस सैन्य मागवू अस सांगता हाच सैन्य दलाचा अपमान आहे। ते काय तुमचे खाजगी नोकर आहेत देशा साठी ते लड्ह्तात तुमच्या साठी नाही। फार लवकर आपण इतिहास विसरतो। कामाची सिस्टम अपनाला माहित नाही। माणसाला महत्व दिले जाते कार्य प्रनालिला नाही। काय करायचे भारत माजा देश महान। रविन्द्र

Sunday, February 7, 2010

कालाची पाखर आणि दिवसाचे पंख

काळदिवसांचे पंख लेवुन उडून जातो अन आपण त्याकडे भारावलेल्या नजरेने पाहत राहतो। समुद्रातील बारीक़ रेती हातातून कधी निसटुन गेली आपणाला जानावत नाही। पाया खालची वालू केंव्हा सरकली समजत ही नाही। अन वेळेस वार्तामानाची जाणीव होते तेंव्हा काळ फार फार दूर गेलेला असतो.कालाची हीच खरी अड़चन असते की अपन त्याला पुन्हा मागारी अनु शकत नाही। घड्यालातलेकाटे मागे फिरवू शकतो पण समय मागे येऊ शकत नाही। आयुष्यात बऱ्याचवेळेस अस जानावायाला लागत की अमुक या वेळेस अस वागायला नको होंत थोडा विचार करायला हवा होता। थोड थाम्बलो असतो तर कदाचित .......?पण त्याला खरच काहि अर्थ नसतो आयुष्यच त्या वेळेचे मूल्यमापन आजच्या नजरेने करण्यात कायअर्थ जीवन हेच मुळी अकल्पित असत अनपेक्षित असत .जे वाट्याला आल तेच आपल मानन तेच आपल भागदेय। सुख: अणि दुःख: हे सर्व आपल्या शारीरिक प्रतिक्रियेवर अवलंबून असते। शारीरिक वेदनेला आपन दुःख: समजतो। पण ते तस नसाव। आपल आयुष्य हे फ़क्त आपल आसत.ते आपणाला भोगुन संपवाव लागत. बाकीचे फ़क्त साक्षीदार असतात। मग त्याच आखन सुधा आपणच करायच। जे स्वताला जगायच त्याची जानस्वताला हावी ना। रविन्द्र ०८.०२.2010

Monday, February 1, 2010

कर मजे जुलती

त्यक्तबहिष्कृत मी ज्या कलि एकान्ति डोले भरती तेथे कर माज़े जुलती.जगण्याच्या वाटेवर अनेकदा नको असलेल्या तहावर आपल्याला सही करावी लागते। अनेक संकताना सहन करावे लागते कुणाच्या तरी आधाराची गरज भासते। कुणी तरी पाठीशी उभे रहावे असे वाटते। पण सर्वानाच तशी इछा असुनही कही करता येत नहीं। असे जिवलग नेहमी मनाने आपल्या बरोबर असतात .अशा साठी सुधा कवी नतमस्तक होतो। आयुष्यात सुखाच्या शिखरावर असताना अश्यांची आठवणहोने ही आपली संस्कृति आहे। तीच जतन करने हे खर जगने. आहे .कालच्या ओघात सुख दुःख: येतात जातात पण जगने हे प्रवाही असते। ते सतत चलायालाच हवे। ह्या सर्वाना बरोबर घेउन जगण्याचा आनंद उपभोगने यातच त्याच सार्थक आसते। जगने हे जगण्या साठी असते अकाली सम्पवान्य साठी नसते।। ते कधी तरी शेवटाला जाणारच आहे .जन्माला आला त्याच क्षणी ते ठरलेले आहे। जगने काय आहे हे समजुन घेण्या आधीच कोवले जीव मृतुकडे धाव घेतात। अपरी पक्व विचारांचा हा परिणाम आसतो। उजड्नारा दिवस मावळत आसतो आणि पुन्हा उजड़त आसतो। शिशिर जाणार आणि वसंत येणार हे क्रम प्राप्त आहे। हा निसर्गाचा नियम आहे। आपण सुधा निसर्गातील एक जिव आहोत। शेवटी एवढेच की ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करावी। रविन्द्र ०२.०२.2010