Monday, March 22, 2010

मराठी साहित्य सम्मेल्लन आणि ते ही पुण्यात ?

मराठी साहित्य सम्मेल्लन पुण्यात उदयापासून सुरु होते आहे। कालच गुटका गाजला माणिकचंद फेम धारीवाल याना २० लाख परत मागावे लागले।। अभय बंग यानि आवाज उठवला म्हणून हे झाले। कोणी साहित्तिकाने गुटका विरोधी आन्दोलन केल्याचे आठवत नहीं। पण आता सर्वाना कंठ फुटला। रात्रि घरी दारू ढोसयाला याना कही वाटत नाही. पण जगाला उपदेश करायला तयार। सर्व वेगवेगले मुखवटे वापरत असतात। कर्तुत्व नसलेली मानसे व्यासपीठ अडवू लागलित। आणि त्याना नेते म्हणून पाहण्याच आपल्या नशिबी आलाय। गांधीच्या देशात साधेपना हद्दपार झालाय। जयांच्या पावलावर पाय ठेउन चालायचे तेच पाय जड़ झालेत। मुलात ते पाय मातीचेच होते पण आपण त्याना प्रेषित बनवले। उदया रामनवमी आता गरज आहे नव्या रामराज्याची लोकानी ते फ़क्त ऐकले आहे अनुभवले नाही। रविन्द्र २१.०३.2010

Wednesday, March 17, 2010

गुडी पाडवा

प्रत्येक धर्माची नविन वर्षे ही वेगवेगल्याकाळात सुरु होतात। त्याचा एक फायदा असा होतो की एका नविन वर्षाचे ठराव आपण जर अमलात अणु शकलो नाही तर लगेच पुढचे नविन वर्ष हजर असते। विश्वाचा विचार केला तर एक वर्षाचा काळ हा फार अल्प असतो। पण अशाश्वत मानवी जीवनाचा विचार केला तर तोच काळ सिन्हावोलोकन करण्यास फार उपयुक्त ठरतो.मानवी मनाला उभारी देण्या साठी त्याचा फार उपयोग होतो। येणारे नविन वर्ष चांगले असेल ही आशा त्याच्या मानत रुजते। लहान असतानाचे नविन वर्ष खरोखरच नविन वाटत असे.आताचे तसे जाणवत नाही कदाचित वाढलेल्या वयाचा हा परिणाम असेल। नीबर झालेल्या मनाला लिमबाच्या पानाची कोवलिक समजत नसेल। निष्पाप बालपण हे निसर्गाने दिलेले देणअसतं पण आपल्या कडून त्याचं जतन केलं जात नाही ते कधी हातातून निसटुन जातं लक्षात पण येत नाही। ते बालपण नाही पण ती निरागसता आयुष्य भर जपता आली तरी फार चांगल होइल पण आयुष्याला उभारी देण्याचे काम ही नव वर्षे नक्कीच करत असतात। त्यांच। स्वागत पण आपण आनंदानेच करू या। रविन्द्र १६.०३.2010

Monday, March 15, 2010

देनाराचे हात घ्यावे

देना राने देत जावे ,घेनारयाने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देनाराचे हात घ्यावे। इतक्या सहज सोप्या भाषेत जीवनाचे इतके मोठ सार सांगणारे विंदा आज कालाच्या आड़ गेले। कलाकार कधी मरत नसतात कारण ते कलाकृति मागे ठेउन जाट असतात। अणि तीच त्यांची खरी ओळख असते। कबीर पुरस्कार किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार किंवा अगदी ज्ञानपीठ पुरस्कार असो। त्याची रक्कम हातात येण्या आधीच ती कोंनत्या संस्थेला द्यायची याचा हिशेब ठेवणारा हा अगदी अवलिया कवी होता.त्यानी जस लिखाण केलं ,तसच ते जगले। आतून बाहेरून एकाच प्रकारचे .कलाकार म्हणून ,इतका मोठा असलेला हा माणुस जगात वावरताना इतका साधा असतो ह्या गोष्टीवर विश्वास बसणे आजच्या काळात तरी कठिन वाटते। त्यांच काव्य वाचन ऐकण्याचा योग माला आला आहे पाडगावकर ,बापट, विंदा यांच्या कवितेवर आमच भाव विश्व बहरले आहे। आम्ही नशीबवान आहोत की आशा लोकाना आम्ही याची देहा याची डोला पाहिले आहे, ऐकले आहे। अशी लोकं ही वीरान जीवनातली गारव्याची ठिकाने आहेत। काही काळ त्यांच्या सहवासात काढल्यावर जीवन जगण्याची उमेद वाढते। ते कस जगाव हे कळत। । शेवटी ते हात जरी आपण घेवु शकलो तरी आयुष्य भरून पावल्या सारखे होइल। रविन्द्र १४.०३.२०१०

Thursday, March 4, 2010

काहि क्षण हे जगायचे असतात

सर्वच आयुष्य हे तक्रारी साठी नसतं .काहि क्षण तरी जगयाचे असतात परिणामाची पर्वा न करता .हातातलं वार्तामानाच। फुलपाखरू मुक्त पणे सोडून द्यायचं असत॥ त्याच्या सारख। स्वचंदी पणे फिरयच असत। अडचणी, दुःख:,हे तर चालतच राहणार आहे त्याच्या सह जगायच असत .त्याचा स्वाद चाखायला हवा। बघुया रविन्द्र ०४.०३.2010