Friday, September 9, 2011

punha

गणपती बाप्पा मोरया हि ललकारी आता पुन्हा आसमंतात दरवळणार .वर्षानु वर्षे हि साद हजारो तरुणायीला 
सादसादघालत  असते .नवी येणारे तरुण पिढी हि बाप्पाच्या प्रेमात पडत असतेसर्व तरुणायीलाबाप्पाआपलाच 
वाटत असतो. बाप्पा हेच एक ठिकाण असे असतेकि सर्वाना तिथे पाहिजे ते करता येते.बाप्पाच्यानावावर  सर्व
काही खपून जाते.

Tuesday, May 17, 2011

punha ekda

बऱ्याचकाळाने  पुन्हा एकदा आता इकडे वळावेसे वाटले. काळ आपल्या गतीने धावत आहे  आपली गती थांबली
आहे. निष्क्रिय आयुष्य चालत आहे. जगण्याच प्रयोजन समजत नाही. भविष्य बद्दल काहीच आडाखे बांधता येत नाही.आलेला दिवस ढकलतोय .pahuya

punha ekda

बऱ्याचकाळाने  पुन्हा एकदा आता इकडे वळावेसे वाटले. काळ आपल्या गतीने धावत आहे  आपली गती थांबली
आहे. निष्क्रिय आयुष्य चालत आहे. जगण्याच प्रयोजन समजत नाही. भविष्य बद्दल काहीच आडाखे बांधता येत नाही.आलेला दिवस ढकलतोय .


punha hari om

punha ekda 

Saturday, March 5, 2011

raviwar

रविवार 

Wednesday, March 2, 2011

dharma

शरीर सोडताना धन तिजोरीत पडलेले राहते, पशु गोठया मध्ये बांधलेले रहातात पत्नी घराच्या देवाज्या पर्यंतच साथ देते, पुत्र स्मशाना पर्यंतच साथ देतात, शरीर चिते पर्यंत साथ देते,या नंतर परलोकात फक्त धर्मच जीवा बरोबर साथ देतो.
सर्वांचे कल्याण होवो,
सर्व सुखी होवोत,
सर्व निरोगी होवोत,
कधी कुणाला किंचित 
मात्र हि दुख: न होवो .
०२.०३.2011i

rajui ek sathvan

राजुरीच्या प्रत्येकाने आपल्या जीवनाची दिशा स्वत ठरवली होती. त्यांच्या नीती अनीतीच्या कल्पना ह्या त्यांच्या  
निभावले जाईल स्वताच्या होत्या. जगाचा फार मोठ विचार त्यांनी कधी केला नाही.पैशांनी आपण सर्व काही निभवून नेवू असे त्यांना वाटत होते. सर्व काही मिळवले पण त्यांना हवी असलेली अध्यात्माची जोड त्यांना मिळाली नाही.त्या मुले कहाणी सफल संपूर्ण होवू शकली नाही.दारूच व्यसन वंश परंपरेने चालत आलेले होते. त्या बरोबर येणारे दुर्गुण चोर पावलांनी आले. आयुष्याचा उपभोग घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दारू आणि मटन हेच मानल गेले.त्या बरोबर मस्तीही आली. मारामाऱ्याआल्या .पैसा मिळाला पण तो उदास विचारे खर्च कसा करायचा हे त्यांना कधी जमले नाही. राजुरीच्या घरात एखादा वारकरी जन्माला आला असता ,शिक्षणच महत्वंसमजणारा भाऊराव पाटील जन्माला आला असता तरी नंदनवन फुलले असते.शिक्षणाच्या बाबतीत ५० वर्षानंतरही घर होते तिथेच राहिले.बदलत्या काळाबरोबर स्वत मध्ये बदल घडवून आणतात तेच जगा बरोबर धावू शकतात बाकीच्यांची दमछाक होते. 
काहीका असेना काशिका असेना पण हि सर्व माझी माणसे आहेत. कुठल्या तरी कालखंडात माझ्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडला आहे, माज्याशी ती फार आपुलकीने वागली आहेत. माझ्याशी त्यांचे कधीचभांडण झाले नाही. माझ्या मनात त्यांच्या बद्दल किंचितही रोष नाही. ती त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जगली. मी माझ्या भाग्देया प्रमाणे जगलो .अस्ताला जाणाऱ्यासूर्याकडे ज्या प्रमाणे आपण अनिमेश नजरेने पाहतो. त्या मध्ये एक कातरता भरलेली असते. तशा काहीश्या नजरेने मी ह्या सर्वाकडे पाहत असतो. माझ्या आयुष्याचा काळ ज्यांनी कळतनकळत आनंद दायी केला सुखदायी केला त्या सर्वांच्या साठी माझ्या डोळ्यात दोन अश्रू उभे राहतात.        ०२.०३.2011

shshwat kal

काळ शाश्वत आहे. अनादी आहे. अनंत आहे. आपल प्रवाहीपण त्याने त्याच्या साठी त्याने ठरवून घेतलेले आहे. आपण त्या प्रवाहात नियातीच्च्या संकेतानुसार पडलो आहोत. आपल्याला स्वताची अशी गती नाही  तो फिरवेल तास आपण फिरायचे.आणि एक दिवस त्याच्या परिघाच्या बाहेर आलो तर दूरवर फेकले जायचे  बस कालचक्राला ना खंत ना खेद

Saturday, February 26, 2011

Tuesday, February 22, 2011

दयाघन

दयाला एवढे द्यावे ,फुलांचे रंग न जावे .उडाया पक्ष्या साठी जरा आभाळ ठेवावे।
मलो ना पदर कोणाचा ,अमंगल स्पर्श ना होवो.कुनाही बाय लेकीची रिकामी कुस ना रहो।
घराला उम्बरा राहो,पेटतीराहुदे चुल,कुन्ही माय पदराशी खेलते रहू दे मूल। ,
दयाला एवढे द्यावे ,भुइचे अंग मी व्हावे ,
शेवटी श्वास जाताना ,फुलांचे रंग मी व्हावे।


२२.०२.2011

Tuesday, January 25, 2011

मधुमेह


शेवटी कसा तरी मधुमेह नोर्मल वर आला .पण एक टांगती तलवार डोक्यावर सतत राहणार।
आयुष्य जगायाचे तर त्या समोर धेय हवे.पण सध्या त्याचीच उणीव भासत आहे। अशी अवस्था होतअसेल तर जगलो म्हणजे नक्की काय केले।
आता वय वाढत आहे। म्हातारपण लोकाना जानावायाला लागले आहे। सुरकुत्या नजरेला दिसत आहेत।.असा म्हातारा माणुस कुणाला आवडणार?
परमेश्वराने दिलेले आयुष्य जसे जाणार असेल तसेच जाणार।




रविन्द्र शिंदे २६/०१/2011