Wednesday, April 22, 2015

 उन्हाळ्याचा उकाडा जाणवायला लागला ह्या वर्षीचा उन्हाळा फारच त्रासदायक वाटायला सुरवात झाली आहे
तनिष्का आणि ऋत्विक सुटी साठी आलेले आहेत पोहण्याचा वर्ग लावला आहे हळू हळू शिकत आहेत लहान
मुलांना शिकवण्यामुळे आपण त्यांच्या आठवणीच्या रूपाने जिवंत रहात असतो आपण ह्या जगात नसलो तरी
त्यांच्या मनातील आठवणी आपले अस्तित्व जागे ठेवतात . बाकी विशेष असे काही नाही .



रवींद्र     २२..०४ २०१५ 

Saturday, April 11, 2015

ब अर्र्याच दि व सानी आता पुन्हा इकडे वळलो आहे .पाच वर्षांचा कालावधी गेलेला आहे ख़रे पाहता काहीच सुचत नाही जगणे अगदीच सामान्य झाले आहे . पाच वर्षांनी आयुष्य सुस्त बनवले आहे. खाऊन पुष्ट झालेल्या अळी सारखे आयुष्य जाणवते आहे. जीवनाचे प्रयोजनच हरवलेले आहे भविष्याचा विचार सुद्धा मनात येत नहि. जणू काही हजारो वर्षे आपण असेच जगत राहणार आहोत अशीच् धारणा झाली आहे. आयुष्याच्या या वळणावर इतके निष्काळजी पने आयुष्याकडे पाहणे योग्य नाही कुछ चंद दिन बाकी है और आपको खबर हि नहि.  
                                                                       
                                                                 घटका गेली पळे गेली तास वाझे ठणाणा आयुष्याचा नाश झाला राम का रे म्हणा ना .बघू या काय होते.






पुणे ११..०४ २०१५ रवींद्र 

Wednesday, April 4, 2012

grace


ग्रे स गेला. पावूस निनादत ठेवून गेला.जी. ए.गेले .त्या वेळेस वाटले तसेच  मरण गंधाचे दुख गाणारे गेले.
दोघेही कळायला कठीण पण काळजाचे ठाव घेणारे. स्वताला आणि त्या बरोबर वाचकाला दुखाच्या कोशात
गुंडाळून ठेवणारा महाकवी गेला.मैलाचे दगड हळू हळू उन्मळून पडत आहेत. ज्या सारस्वतांच्या बरोबर आपण.
आपले जीवन घडत गेले. ते सर्व पुढे निघून गेले आहेत.निसर्ग नियम कुणाला चुकत नाही.फक्त याची आठवण
ठेवली पाहिजे. तारीख ०४.०४.२०१२

grace

grace 

grace


grace

grace 

grace