Wednesday, October 13, 2010
मी
सामान्य मानुस
नियतीच्या गतिमध्ये कोणालाच बदल करता येत नसतो.आणि कोणीही कोणाला कायमचा आराम अगर रोग विकृति पासून कायमची मुक्ति देऊ शकत नाही.सर्व सामान्य माणसाला काहीही समजून घ्याचे नसते। त्याना मन लावून कोणताही प्रयत्न करायला नको असतो .आयुष्याला शिस्त्बध वलन लावून घेण्याची त्यांची तयारी नसते.शिक्न्याचे कष्ट नकोत,तपश्चर्या करायला नको। त्याना सोप्या गोष्टी देनगी रुपाने हव्यात। फ़क्त चमत्कार पहायला हवेत.गम्मत म्हणून।
०१.१०.2010
Monday, September 13, 2010
मन
अस हे मन,जगताना फुलणार,फुलत फुलत जगणार।
रक्तवर्णी पंखाच्या ,अजान विहंगा सारख।
सर्व काही अनुभव घेणार, पण तरी सुद्धा
रित रित असणार। कितीही भोगल तरी सुद्धा
भोगुन बरच काही उरलेल। ।
वेदनेन ठस ठस नार। डोहात खोल खोल दुम्ब्नार
मावल्तिचा रक्तिमा अंगभर ल्यालेल।
कहिस बुजर, पण तरी सुद्धा ,
निष्पर्ण वृक्षाच्या फांदी वरुन,आर्त पणेसाद घालणार।
सर्वा मध्ये असुनही एकट असलेल। जीवनाचा प्याला समोर
भरलेला असुनही त्याचा तल नजरेनशोधणार।
काय हवय याला, सदाचीच अतृप्त तेची ओढ़
प्रवास परतीचा
कशाला हवय हे सर्व व्यापून टाकणार जीवानाच भाग्य। आणि त्यातूनच उदभावनारा रिक्त पना।
मोकले करावे आकाश ,धुवाधार कोसलून मेघानी.अन द्यावी उसंत धरतीला थोड़ी,बिजांच्या रुजन्यासठी
वादलं विरून जावित समुद्रावरच मागमुसाही दिसू नये कुणाला त्यांचा किनार्यावर ।
सर्व काही सहज सरल, काहीच नसाव्यात मनात कल्पना , नसावेत आकंक्षाचे डोंगर,
अन पाठोपाठ येनारया निराशेच्या खोल दरया .अन अशातच यावा पैल तिरवारून सांगावा।
संथ मनाने,शांत चित्ताने द्यावी साद, त्या हाकेला अन निघाव प्रवासाला अद्न्याताच्या १२.०९.2010