Sunday, September 5, 2010

अखेरचे पर्व

जन्मा पासून वेग वेगळ्या पर्वा मधून आपले आयुष्य मार्गक्रमण करत असते। ही पर्व माणसाच्या जगण्याला वेग वेगळी परिमाण प्राप्त करून देत असतात .कधी सुसह्य असतात तर कधी मनाला क्लेश दायक ठरतात। आयुष्याच्या संध्या कालची चाहुल जाणवू लागली आहे.स्वताच्याच सावल्या संध्याकाळी लाम्ब होतात.त्याची
जाणीव ठेवायला पाहिजे.कालाची पावल काय सांगतात याचा कानोसा घ्यायला पाहिजे। सभोवतालची परिस्थिति बदलत आहे। स्वतामध्ये त्या प्रमाणे बदल घडवून आणायला पाहिजे। कुणी तरी त्याची जाणीव
करून द्यायच्या अगोदर स्वतामध्ये बदल घडवायला पाहिजे। एक निखल सत्य मान्य करून त्या प्रमाणे वागायला पाहिजे।नाटकाचा अखेराचा अंक चालू झाल आहे। शांत पणे एक्सिटची तयारी करायला पाहिजे।
कुणी तरी त्याची जाणीव करून देण्या अगोदर आपण बाजूला जायला पाहिजे.अखेरचे पर्व चालू झाले आहे ।
०५.०९.२०१०

No comments:

Post a Comment