राजुरीच्या प्रत्येकाने आपल्या जीवनाची दिशा स्वत ठरवली होती. त्यांच्या नीती अनीतीच्या कल्पना ह्या त्यांच्या
निभावले जाईल स्वताच्या होत्या. जगाचा फार मोठ विचार त्यांनी कधी केला नाही.पैशांनी आपण सर्व काही निभवून नेवू असे त्यांना वाटत होते. सर्व काही मिळवले पण त्यांना हवी असलेली अध्यात्माची जोड त्यांना मिळाली नाही.त्या मुले कहाणी सफल संपूर्ण होवू शकली नाही.दारूच व्यसन वंश परंपरेने चालत आलेले होते. त्या बरोबर येणारे दुर्गुण चोर पावलांनी आले. आयुष्याचा उपभोग घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दारू आणि मटन हेच मानल गेले.त्या बरोबर मस्तीही आली. मारामाऱ्याआल्या .पैसा मिळाला पण तो उदास विचारे खर्च कसा करायचा हे त्यांना कधी जमले नाही. राजुरीच्या घरात एखादा वारकरी जन्माला आला असता ,शिक्षणच महत्वंसमजणारा भाऊराव पाटील जन्माला आला असता तरी नंदनवन फुलले असते.शिक्षणाच्या बाबतीत ५० वर्षानंतरही घर होते तिथेच राहिले.बदलत्या काळाबरोबर स्वत मध्ये बदल घडवून आणतात तेच जगा बरोबर धावू शकतात बाकीच्यांची दमछाक होते.
काहीका असेना काशिका असेना पण हि सर्व माझी माणसे आहेत. कुठल्या तरी कालखंडात माझ्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडला आहे, माज्याशी ती फार आपुलकीने वागली आहेत. माझ्याशी त्यांचे कधीचभांडण झाले नाही. माझ्या मनात त्यांच्या बद्दल किंचितही रोष नाही. ती त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जगली. मी माझ्या भाग्देया प्रमाणे जगलो .अस्ताला जाणाऱ्यासूर्याकडे ज्या प्रमाणे आपण अनिमेश नजरेने पाहतो. त्या मध्ये एक कातरता भरलेली असते. तशा काहीश्या नजरेने मी ह्या सर्वाकडे पाहत असतो. माझ्या आयुष्याचा काळ ज्यांनी कळतनकळत आनंद दायी केला सुखदायी केला त्या सर्वांच्या साठी माझ्या डोळ्यात दोन अश्रू उभे राहतात. ०२.०३.2011
No comments:
Post a Comment