ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता अशा थाटात आज सकाळी पावसाचे आगमन झाले . जुना मित्र भेटला असा आनंद झाला पहिल्या पावसाची अशी अनामिक ओढ जीवाला दर वर्षी लागत असते . पहाटे येणारा पाऊस मनाला खास सुखावून जातो . दिवाळीच्या पहाटे जसे आनंदात असतो तसे ह्या वेळेस वाटते . घरातील सर्व साखर झोपेत असताना मी त्याचे स्वागत गरमा गरम चहाने करतो. माझ्या आयुष्यात दर वर्षी येणारा तो आनंद सोहळा असतो क़हि वर्षापूर्वी खेरवाडा राजस्थान येथे असताना असाच पहाटे तो कोसळत आला मला मनस्वी आनंद झाला झाला खूप जोरात तो कोसळत होता मी रवींद्र नाथांचे गीतांजली काढले आणि खिडकीत बसून मोठ मोठ्याने म्हणू लागलो पावसाचा आवाज इतका मोठा होता कि कुणाला काही ऐकू जात नव्हते अर्थात म्हणा सर्व गाढ झोपेत होते . अशा सुखद आठवणी मी साठवून ठेवल्या आहेत.
०५. ०६ २०१५
०५. ०६ २०१५
No comments:
Post a Comment