Friday, February 26, 2010
जीवनाच्या निरर्थकतेची जाणीव
बरच आयुष्य घालवल्यावर कधी तरी अस काहि घडतं घालवलेल्या आयुष्या बद्दल निराशा तर वाटतेच परन्तु भविष्या बद्दल मन कचरते.झालं ते पुरे झालं असचवाटायला लागत .नाही तरी पुढे आपन काय विशेष करणार असं मनाला वाटत रहाते आकाशात विहार करणारे आणि जलात संचार करणारे जश्या आपल्या । पावूल वाटा मागे ठेवत नाहीत तसं काहीसं नियति बद्दल घडत आसतं ती आपल्या येण्याची किंवा जाण्याची पुसट्सी कल्पना येवू देत नाही। आशा वेळेस ज्याला आपण कर्तुत्व समजत होतो ते शुन्य वत भासु लागतं। आपले म्हणून समजत होतो ते किती परके आहेत याची जाणीव होते। दोष त्यांचा नसतोच तो आपल्या जाणीवेचा असतो असं काहीसं मनात घोंगावत असतानाही आपण हे सर्व बांध तोडून मुक्त का होऊ नये?खर तर शरीराने मुक्त होण्याची शक्यता कमी असते पण मनाने तरी स्वताला का बंध मुक्त करू नये। पुन्हा पुन्हा नात्या गोत्याच्या बन्धनात का अडकून पडायच.मी म्हणून माझी जी ओळख आहे ती स्पष्ट पणे जगाला का सांगू नये?एकदाच लाभनारा हा माणूस जन्म कुणा साठी खर्च करायचा हे स्वातंत्र्य आपण का उपभोगयाचे नाही? दुःख:,निराशा ,राग,वेदना असं काहीसं जाणवत नाही पण अगतिकता मात्र जाणवते .काहि वर्षानी गात्रे शिथिल झाल्यावर ह्याची जाणीव फार तीव्रतेने होणार आहे। मग आजच आपण आपल्या मुक्त तेचा मार्ग का शोधू नये। संसार दुःख:आने भरलेला आहे उदया काहि तरी वेगले घडेल या भावनेने म्हणा किंवा भविष्याच्या भीतीने म्हणा आपण आहे त्याच चक्रात फिरत राहतो। कधी तरी यातून बाहेर पडायचा मानस करायलाच हवा तीच मुक्तीची सुरवात असेल। तरच आत्म्याची ओळख स्वताला होइल .खुपदा हे विचार स्मशान वैराग्य आल्या सारखे येतात अन जातात तस। होऊ नये .यातून बाहेर यायलाच हव । रविन्द्र २८.०२.२०१०
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment