Monday, February 1, 2010
कर मजे जुलती
त्यक्तबहिष्कृत मी ज्या कलि एकान्ति डोले भरती तेथे कर माज़े जुलती.जगण्याच्या वाटेवर अनेकदा नको असलेल्या तहावर आपल्याला सही करावी लागते। अनेक संकताना सहन करावे लागते कुणाच्या तरी आधाराची गरज भासते। कुणी तरी पाठीशी उभे रहावे असे वाटते। पण सर्वानाच तशी इछा असुनही कही करता येत नहीं। असे जिवलग नेहमी मनाने आपल्या बरोबर असतात .अशा साठी सुधा कवी नतमस्तक होतो। आयुष्यात सुखाच्या शिखरावर असताना अश्यांची आठवणहोने ही आपली संस्कृति आहे। तीच जतन करने हे खर जगने. आहे .कालच्या ओघात सुख दुःख: येतात जातात पण जगने हे प्रवाही असते। ते सतत चलायालाच हवे। ह्या सर्वाना बरोबर घेउन जगण्याचा आनंद उपभोगने यातच त्याच सार्थक आसते। जगने हे जगण्या साठी असते अकाली सम्पवान्य साठी नसते।। ते कधी तरी शेवटाला जाणारच आहे .जन्माला आला त्याच क्षणी ते ठरलेले आहे। जगने काय आहे हे समजुन घेण्या आधीच कोवले जीव मृतुकडे धाव घेतात। अपरी पक्व विचारांचा हा परिणाम आसतो। उजड्नारा दिवस मावळत आसतो आणि पुन्हा उजड़त आसतो। शिशिर जाणार आणि वसंत येणार हे क्रम प्राप्त आहे। हा निसर्गाचा नियम आहे। आपण सुधा निसर्गातील एक जिव आहोत। शेवटी एवढेच की ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करावी। रविन्द्र ०२.०२.2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment