Wednesday, March 17, 2010
गुडी पाडवा
प्रत्येक धर्माची नविन वर्षे ही वेगवेगल्याकाळात सुरु होतात। त्याचा एक फायदा असा होतो की एका नविन वर्षाचे ठराव आपण जर अमलात अणु शकलो नाही तर लगेच पुढचे नविन वर्ष हजर असते। विश्वाचा विचार केला तर एक वर्षाचा काळ हा फार अल्प असतो। पण अशाश्वत मानवी जीवनाचा विचार केला तर तोच काळ सिन्हावोलोकन करण्यास फार उपयुक्त ठरतो.मानवी मनाला उभारी देण्या साठी त्याचा फार उपयोग होतो। येणारे नविन वर्ष चांगले असेल ही आशा त्याच्या मानत रुजते। लहान असतानाचे नविन वर्ष खरोखरच नविन वाटत असे.आताचे तसे जाणवत नाही कदाचित वाढलेल्या वयाचा हा परिणाम असेल। नीबर झालेल्या मनाला लिमबाच्या पानाची कोवलिक समजत नसेल। निष्पाप बालपण हे निसर्गाने दिलेले देणअसतं पण आपल्या कडून त्याचं जतन केलं जात नाही ते कधी हातातून निसटुन जातं लक्षात पण येत नाही। ते बालपण नाही पण ती निरागसता आयुष्य भर जपता आली तरी फार चांगल होइल पण आयुष्याला उभारी देण्याचे काम ही नव वर्षे नक्कीच करत असतात। त्यांच। स्वागत पण आपण आनंदानेच करू या। रविन्द्र १६.०३.2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment