देना राने देत जावे ,घेनारयाने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देनाराचे हात घ्यावे। इतक्या सहज सोप्या भाषेत जीवनाचे इतके मोठ सार सांगणारे विंदा आज कालाच्या आड़ गेले। कलाकार कधी मरत नसतात कारण ते कलाकृति मागे ठेउन जाट असतात। अणि तीच त्यांची खरी ओळख असते। कबीर पुरस्कार किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार किंवा अगदी ज्ञानपीठ पुरस्कार असो। त्याची रक्कम हातात येण्या आधीच ती कोंनत्या संस्थेला द्यायची याचा हिशेब ठेवणारा हा अगदी अवलिया कवी होता.त्यानी जस लिखाण केलं ,तसच ते जगले। आतून बाहेरून एकाच प्रकारचे .कलाकार म्हणून ,इतका मोठा असलेला हा माणुस जगात वावरताना इतका साधा असतो ह्या गोष्टीवर विश्वास बसणे आजच्या काळात तरी कठिन वाटते। त्यांच काव्य वाचन ऐकण्याचा योग माला आला आहे पाडगावकर ,बापट, विंदा यांच्या कवितेवर आमच भाव विश्व बहरले आहे। आम्ही नशीबवान आहोत की आशा लोकाना आम्ही याची देहा याची डोला पाहिले आहे, ऐकले आहे। अशी लोकं ही वीरान जीवनातली गारव्याची ठिकाने आहेत। काही काळ त्यांच्या सहवासात काढल्यावर जीवन जगण्याची उमेद वाढते। ते कस जगाव हे कळत। । शेवटी ते हात जरी आपण घेवु शकलो तरी आयुष्य भरून पावल्या सारखे होइल। रविन्द्र १४.०३.२०१०
Monday, March 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment