Friday, August 13, 2010

एक पर्व संपले

एक पर्व जे एकातपा पेक्षा जास्त काळ जीवन व्यापून राहिले होते त्याचा शेवट झाला.खर पाहिले तर हे पर्व काहीसे अकस्मात् आणि अनपेक्षित रित्या जीवनात आले, त्याची अपेक्षा केलि नव्हती त्या कारणानेपाहिजे तेवढा वेळ विचार करायला मिळाला नहीं. त्या वेळेस जे झाले ते विधि लिखित होते असेच माझे आजही ठाम मत आहे। त्या बाबत काही विचार करणे योग्य होणार नहीं। नियतीची खेळी म्हणून हे स्वीकारने हेच फ़क्त नशिबी उरते.त्या कालाने बरेच काही दिले आणि काढून ही घेतले। कोणत्याही गोष्टीच्या अत्युच शिखरावर असताना शेवट होणे ही भाग्य सर्वानाच लाभत नहीं। हे असे होणार याची अन्धुकशी कल्पना येत चालली होती पण त्या बाबत काही करण्याची क्षमता आता उरली नाही हे सत्य मान्य करायलाच हवे। फ़क्त व्यक्ति म्हणून आपले मोठेपण अखेर पर्यंत टिकवून ठेवणे फार कठिन असते। आज अपनाला जे मिलते ते व्यक्ति म्हणून की इतर कारणाने हे तपासून पहाणे फार गरजेचे आसते .कशातच गुंतून न रहाने हेच खरे पण ते जमत नाही। कधी मन तर कधी शरीर मागे मागे धावते आणि कष्टि होते। शेवटी दुःख हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे मानून चालनेयाचाच अर्थ जीवन उकलने जे दिले ते नियतीने दिले असे मानले तर आज जे काही घडते ती सुद्धा नियातिचिच खेळी आहे हेच खरे असो। १३.०८.2010

No comments:

Post a Comment