रक्तदाब ,पाठ्दुखी ,गुडगेदुखी ,सांधा निखलने ,जास्त वजन आणि आता मधुमेहाची सुरवात.सर्व रोग आता एकाच
शरीरात वस्तीला आले आहेत।.पुढील सर्व आयुष्य त्यांच्या सोबतीने घालवयाचे आहे। ज्याला उपाय नाही ते शांतपणे
सहन करने हाच त्यावर एकमेव उपाय असतो .या बद्दल मनाला दुःख करावे असे ही काही नाही.जीवनाचा हा एक भाग आहे। भोगते ते शरीर आपण त्रयास्थाच्या नजरेने फ़क्त पहात रहायेचे। जगताना जगायचे ते आत्म्याच्या साक्षीने।
वासासी जीर्णानि हे एकदा मान्य केले मग कसलाच खेद होत नाही। कदाचित त्या जीर्ण पणाची ही सुरवात असेल।
जाणे हे निश्चित असेल तर शुभस्य शीघ्रम चांगले। पण तरी ज्या शरिराने इतके दिवस साथ संगत केलि अखेरचा
प्रवास पण त्याच्या सोबतिनेच करायचा .१८/१२/2010
Saturday, December 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment