आज वर्षाचा शेवटचा दिवस.खर पाहिले तर वर्ष, महीने, हे मानवाने आपल्या सोयी साठी निर्माण केले.
कल चक्र अखंड फिरत असते .आयुष्याचे सिंहावलोकन करायला थोडा वेळ मिळावा। त्या साठी वर्षाची
संकल्पना निर्माण झाली.माज्या बाबतीत येथून पुढे जाणारी आणि येणारी वर्षे ही बहुतेक सारखीच असतील।
आपल्या जीवनाच्या पुढील वाट्चाली बद्दल विचार करायचाअसल्यास त्या साठी नविन वर्ष ही फार चांगली
संकल्पना आहे। जुन्या वर्षाचा आढावा आणि नविन वर्षाचे आडाखे बांधता येतात .नविन संकल्प सोडण्याची
एक संधि प्राप्त होते।
सन्यासी आश्रमात प्रवेश करण्याची सुरवात नविन वर्षा पासून करावी असे मनात चालले आहे .सन्यास
म्हणजे सांसारिक गोष्टीतुन लक्ष काढून घेणे। झाले एवडेच आपले सांसारिक कर्तव्य होते असे मानून घेणे।
ऐहिक सुखासाठी जगणे नाही तर पारमार्थिक सुखाचा विचार करणे.कर्म करत रहाणे परन्तु त्याच्या यश आणि
अपयशाचा विचार सोडून देणे। जगण्याचा मतितार्थ समजुन घेणे। त्या दिशेने वाटचाल करणे। साधि राहणी,
सुविचार आणि निखाल द्वेष रहित आयुष्य जगणे हाच ह्या नव वर्षाचा ठराव। ३१/१२/2010
Thursday, December 30, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment