Sunday, May 3, 2015

काही घटना अशा अचानक घडतात कि अंगावर येउन आदळतात तस काहीस झाले आणि आपण त्यात पूर्ण पणे वाहत गेलो. कसला मागचा पुढचा विचार केला नाही . परिणामाची पर्व केली नाही . पुढचे सर्व आयुष्य असेच जाणार अशा वेड्या धुंदीत वाहत होतो. जगातली कोणतीच गोष्ट शाश्वत नसते हेच विसरलो होतो . बदल हा जगाचा स्थायी भाव आहे ह्याचा विसर पडला होता . हवेत इमले बांधत होतो . माझ्या सारखा मीच अशा तर्हेने वागत होतो.
                               मग काय झाले ? दुसर्यांच्या जीवावर गमजा मार्नारांची जी गात होते तीच झाली स्वताची उंची मोजताना ज्या दगडावर उभे आहोत त्याचा विसर पडला काही क्षणा पूर्वी स्वताला अनिभिषिक्त राजे समजणारे आम्ही धुळी मिळालो आता पुन्हा धुळीने माखलेल्या रस्त्याने वाटचाल सुरु केली झाले गेले ते एक स्वप्न होते अशी मनाची समजूत घातली आणखी एक अपयश खात्यावर जमा झाले .


रवींद्र ०३. ०४ २०१५

No comments:

Post a Comment